Tuesday, October 1, 2013

आज वीज जायला पाहिजे

आज वीज जायला पाहिजे,
घरात अचानक अंधार लोटला पाहिजे,
क्षणात बुबुळ मोठ होण्याचा आभास,
आणि मेणबत्ती शोधण्याचा त्रास,
प्रकाशाचा गोंधळ थोडा दूर झाला पाहिजे,
आज वीज जायला पाहिजे. 
खिडकी चे पडदे सरकले,
कॉलोनी ची मुलं खिदळले,
हो! चा आवाज करून 
समोरच्या मैदानात जमून 
त्यांना काही मज्जा पाहिजे 
आज वीज जायला पाहिजे 
वरांड्यात उभ असून 
एक रंगी शहर बघून 
जे नेहमी वेगळ्याच चमचमीत असतं 
ते अंधाराने गाढ झोपेत होतं 
शेवटी डोळ्यानाही काही नवीन पाहिजे 
आज वीज जायला पाहिजे 
आणि लिहिता लिहिता खरंच वीज गेली 
एका एक सगळी कामं थांबली 
बाबांची न्यूस,आई ची प्रेस(Iron) आणि माझा लिहणं 
ह्या संयोगा विषयी स्वतःला विचारणं 
एका स्मित हास्या नंतर असा वाटलं 
अशी स्थिती परत वाहयला पाहिजे 
वीज जाऊन आता काही क्षणं झाले 
त्यात आपण हि थोडी मस्ती केली पाहिजे
पण खूप झाला हा अंधार 
आता वीज परत आली पाहिजे

2 comments: