Friday, September 27, 2013

आता साला रडता हि येत नाही

हसवून हसवून कधी,
हसण्याचा विषय झालो,
समजलच नाही.
पोटा वर हाथ ठेऊन डोळे मिटून हसणं
इतका हसणं दुखात कधी बदललं समजलच नाही स्वतःवर हसूनच पोट दुखू लागले ह्या दुखातही आता साला रडता ही येत नाही. . तत्वांच्या भवति कोलाहल , कधी संपला , तत्व कधी विहीन झाले समजलच नाही . त्या कोलाहलात कधी मती हरवली वाट कधी चुक्कू लागली समजलच नाही. तत्वारहित वाटे वर चालता चालता दूर निघून आलो ह्या भटकंती च्या एकटेपणात आता साला रडता ही येत नाही. . एका ठोस इमारती सारखं त्यात कधी कंपना होऊ लागली समजलच नाही. कंपना मुळे इमारतीची नाझुक अवस्था समजलच नाही. मोठ होत्या दरारा इमारतीच्या हळुवार पडण्यावर, आता साला रडता ही येत नाही. . उरले सुरले जितके वाचवले काय वाचवलं समजलच नाही अनेकानेक भिन्न चेहरे उचल्या नंतर स्वतःचा कोणता सुद्धा समजलच नाही. इतका वेगळा,इतकी भिन्नता ओळखणं स्वतःला कठीण ह्या अपरिचित अवस्तेत एक गोष्ट मात्र खरी अनोलखी मध्ये सुद्धा आता साला रडता ही येत नाही. . अश्रू जसे कायमचे विसरले डोळ्याहून रस्ते आणि हूण्क्या स्मरणात नाही इतका कसा भास मुक्त भास रहित तर विहीन अर्थ ह्या भासा ची ,अर्थाची जाणीव असून सुद्धा आता साला रडता ही येत नाही.

No comments:

Post a Comment